Raj Thackeray | सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय 24 तासात 24 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अशात आता या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

There is shortage of medicine in government hospitals in the state – Raj Thackeray 

ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे.

मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?

दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.

दरम्यान, या मुद्द्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयाच्या डीन चे असे म्हणणे आहे की, औषधे नव्हती त्यामुळे मी काही करु शकलो नाही. ठाणे मधील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये देखील काही दिवसांपूर्वी 18 जणांचा मृत्यू झाला होता.

त्याबाबतचा चौकशी अहवाल देखिल आला आहे. चौकशी अहवालामध्ये कोणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही. म्हणजे कदाचित यमराजाची फेरी त्यादिवशी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर होती असचं म्हणावं लागेल.

महाराष्ट्रामध्ये जीवनालाही आणि मृत्यूलाही आता काही किंमत राहीलेली नाही. हे सर्वसामान्य गोर गरीबांचे सरकार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.