Sanjay Raut | राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? – संजय राऊत

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | मुंबई: नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला चांगलं सुनावलं आहे.

अशात आता या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “नांदेडमध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 70 रुग्ण मृत्यूला झुंज देत आहे.

गेल्या वर्षभरात ही पहिली घटना घडली नाही. कळवा रुग्णालयात घडलेली घटना अजूनही ताजी आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कळव्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी दुर्दैवी घटना कशी घडू शकते? असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजित पवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं नव्हतं.”

Does this government really exist? – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण राज्याचे पालक आहे. सध्याच्या सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात रस आहे.

त्यांच्यात जर थोडीशी माणुसकी शिल्लक राहिली असेल तर त्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. कारण आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नाही.

आरोग्यमंत्री नेहमी वेगळ्याच कामात अडकलेले असतात. नांदेड आणि ठाण्यात मोठं रुग्णकांड झालं. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात औषध उपलब्ध नाही. त्यामुळं हे सरकार खरच अस्तित्वात आहे की नाही? हा प्रश्न आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe