Chandrashekhar Bawankule | राज्यात महायुतीच्या 45 जागा आणायच्या; बावनकुळेंच्या भाजप नेत्यांना सूचना

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

त्याचबरोबर निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष देखील तयारीला लागला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहे.

आगामी निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीच्या 45 जागा आणायच्या आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

BJP is the largest party in the Mahayuti – Chandrashekhar Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “महायुतीमधील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. आपल्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील आहे.

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला 45 हुन अधिक जागा जिंकायच्या आहे. त्यामुळं आत्तापासूनच कामाला लागा. राज्यामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामं घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे.”

दरम्यान, नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

“भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत.

संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता‌. नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे.

हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.