Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. अशात आता या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटल आहे.
How many times will the minister be supported by Chief Minister? – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे.
नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. काल २४ आज ७ मृत्यू , ज्यामध्ये १६ निष्पाप बालकांचा समावेश आहे.
आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान… किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देताय, आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघताय. इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय.
त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय ? मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा.
जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे “हत्यारे सरकार” आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | भाजपला सामान्य जनतेचे आणखीन किती बळी हवे? – सुप्रिया सुळे
- Aditya Thackeray | भाजप-मिंधेंना खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्क नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? – संजय राऊत
- Nana Patole | नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे – नाना पटोले
- Raj Thackeray | सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी – राज ठाकरे