Eknath Shinde | नांदेड शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | मुंबई: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासात 31 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

तर या घटनेवरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. अशात आता या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

The state government is taking this incident very seriously – Eknath Shinde

प्रसार माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “नांदेड शहरातील रुग्णालयात घडलेल्या घटनेचा राज्य सरकार आढावा घेत आहे. राज्य सरकार ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत आहे. संबंधित विभागांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालयात पुरेसा औषधीसाठा होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

त्याचबरोबर औषधी खरेदी करण्यासाठी आधीच रुग्णालयाला 12 कोटी रुपये देण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात घडलेल्या या घटनेची योग्य ती चौकशी होऊन, दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार खोचक टीका केली आहे. “कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय.

२ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.

महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही. अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.