Share

Bacchu Kadu | इथे भोंग्याचा प्रश्न मोठा होतो, रुग्णालयाचा नाही – बच्चू कडू

🕒 1 min readBacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यामधील नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इथे भोंग्यांचा प्रश्न मोठा होतो, रुग्णालयाचा नाही, असं बच्चू … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यामधील नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इथे भोंग्यांचा प्रश्न मोठा होतो, रुग्णालयाचा नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Practical demands should be made without political demands  – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “आमदारांचे ज्या प्रकारे उपचार होतात, त्याप्रकारे मतं देणाऱ्यांचे उपचार का होत नाही?

इथं भोंग्यांचा प्रश्न मोठा होतो. मात्र रुग्णालयाच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. हे मोठं दुःख आहे. त्यामुळं यासाठी समोर यायला हवं. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागणं, ही राजकीय मागणी आहे.

ज्यांनी हा राजीनामा मागितला आहे, त्यांच्या काळात काय अवस्था होती? त्यांनी आधी हे तपासून पहावं. या मुद्द्यावरून राजकीय मागणी न करता व्यवहारिक मागणी केली पाहिजे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत?

आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत.संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता‌.

नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे.

हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या