Congress | राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

Congress | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

The entire health system in the state is on ventilators

“धन्य हे खोके सरकार. सामान्य जनतेला आता रडण्याशिवाय काहीच नाही राहिले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आपली खुर्ची टिकवण्यात व्यस्त आहेत.

संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. निष्पाप गरीब लोकांचे प्राण जात आहेत आणि मुख्यमंत्री दसरा मेळाव्याला मैदान कसे मिळेल यासाठी भांडत आहेत. #खोके_सरकार”, असं काँग्रेसने (Congress) ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत राज ठाकरे म्हणाले, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले.

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे.

मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?

दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.