Keshav Upadhye | नांदेडमध्ये घडलेल्या घटनेचं राजकारण करणं अत्यंत दुर्दैवी; केशव उपाध्येंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. तर या मुद्द्यावरून ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

ठाकरे गटाचा या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नांदेडमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहेच; पण त्यावरून आपण करत असलेले राजकरण अजून दुर्दैवी आहे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

The incident in Nanded is unfortunate – Keshav Upadhye

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “नांदेडमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहेच; पण त्यावरून आपण करत असलेले राजकरण अजून दुर्दैवी आहे.

कोरोना काळात मृत्यूचे थैमान सुरू होते, तेव्हा त्याचे कारण आपले दिशाहीन शासन जबाबदार होते. एकीकडे रेमडेसिविर, ऑक्सीजन नाही म्हणून लोक मरत होते, आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री महोदय फेसबुक वर टोमणे मारण्यात व्यस्त होते.

घरी बसण्याचे प्लॅनिंग करत होते. राजकारण करताना कोरोना काळात आपले हात किती खूनानी रंगले आहेत, त्या मृत्यूना अपयश, बेजबाबदार पणाच कारणीभूत होता हे आधी तपासा.”

दरम्यान, ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत व त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा!

या सरकारमध्ये जराशीही माणुसकी व लोकभावनेची चाड उरली असेल तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे. मिध्यांकडे एवढी तरी नीतिमत्ता उरली आहे काय?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.