Jayant Patil | दुर्दैवाने निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, म्हणणारे या परिस्थितीत ढिम्म बसले; नांदेड प्रकरणावरून जयंत पाटलांची सरकारवर टीका

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तास तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये देखील अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Death row is going on in government hospitals of the state – Jayant Patil 

ट्विट करत जयंत पाटील म्हणाले, “राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज नगर.

आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत.

त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे.

दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे?

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.