Girish Mahajan | “… म्हणून विरोधक देव पाण्यात घालून बसलेय”; गिरीश महाजनांनी विरोधकांना धारेवर धरलं

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Girish Mahajan | कराड: मुंबईमध्ये काल (03 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या बैठकीला गैरहजर होते. त्यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण सांगून अजित पवार देवगिरी बंगल्यावरच होते.

या घटनेनंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज नसल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar could not attend the meeting due to ill health – Girish Mahajan

कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील, मी आणि अन्य मंत्री उपस्थित होते.

मात्र, प्रकृती खराब असल्यामुळे अजित पवार या बैठकीला येऊ शकले नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं माझ्यासमोर बोलणं झालं होतं.

अजित पवार काल कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले नव्हते. सध्या आमचे विरोधक आमचं कसं फाटेल, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अनुपस्थितीचा ते त्यांच्या पद्धतीने अर्थ काढत आहे.

दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहे.

अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंत्र्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, त्यामुळं अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

म्हणून या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe