Nana Patole | सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यू तांडव सुरू अन् शिंदे-फडणवीस दिल्लीत हुजरेगिरी करताय – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये सध्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयाची देखील हीच अवस्था झाली आहे. राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरा ची हुजरेगिरी करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

After Aurangabad, now Nagpur has been shaken, 25 patients have died in 24 hours – Nana Patole

ट्विट करत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; नांदेड, औरंगाबादनंतर आता नागपूर हादरलं, 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरा ची हुजरेगिरी करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. राज्यात प्रचंड प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.येड्या सरकार च्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत.महाराष्ट्रातील लोकांचे जीव जात आहेत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे लोकसभेच्या निवडणूक तयारीच्या पक्ष बैठकीत व्यस्त आहेत.”

दरम्यान, या प्रकरणावरून जयंत पाटील यांनी देखील राज्य सरकारचे कान टोचले आहे. “राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज नगर.

आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत.

त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे.

दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे?”, असं जयंत पाटील यांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.