Share

Jitendra Awhad | राज्यातील शासकीय रुग्णालये गोरगरिबांचे कत्तलखाने बनलेय – जितेंद्र आव्हाड

🕒 1 min read Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड येथील शासकीय रुग्णालयानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 तर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड येथील शासकीय रुग्णालयानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 तर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील राज्य सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Government hospitals in the state have become slaughterhouses for the poor – Jitendra Awhad

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. ठाण्यातील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 27 मृत्यू, नांदेडमध्ये एकाच दिवसात 24 मृत्यू, काल घाटी (संभाजी नगर) येथे जवळपास 20 जणांचा मृत्यू, तर आज नागपूरमध्ये 24 तासात 25 जणांचा मृत्यू.

इतक्या भयंकर घटना घडत आहेत. यावर हे ट्रीपल इंजिनच राज्य सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्री अवाक्षर काढायला तयार नाहीत.

या रुग्णालयात पुरेश्या सुविधा नाहीत, स्टाफ ची कमकरता आणि औषधांचा पडलेला दुष्काळ गोर गरीब रुग्णांच्या जीवावर बेततो आहे. राज्यातील फक्त शासकीय रुग्णालयेच नाही तर हे ट्रीपल इंजिन सरकार देखील वेंटीलेटर वर असल्याचं दिसून येत आहे. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील राज्य सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.”

दरम्यान, या मुद्द्यावरून नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; नांदेड, औरंगाबादनंतर आता नागपूर हादरलं, 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरा ची हुजरेगिरी करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. राज्यात प्रचंड प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.येड्या सरकार च्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत.महाराष्ट्रातील लोकांचे जीव जात आहेत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे लोकसभेच्या निवडणूक तयारीच्या पक्ष बैठकीत व्यस्त आहेत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही