Chitra Wagh | संजय राऊत विदुषकी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना आमदार अपात्रेवर निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) वेळ घेत असल्याचे ठाकरे गटानं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्राच्या टाइमपास चित्रपटाचे लेखक राहुल नार्वेकर आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत विदुषकी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटल आहे.

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “कुणावरही अन्याय होऊ नये, म्हणून काळजीपूर्वक अभ्यास करून आणि पुराव्यांची छाननी करून निकाल देण्याची विधानसभा अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर यांची भूमिका आहे.

ते राबवत असलेल्या गंभीर निर्णयप्रक्रियेला टाईमपास चित्रपटाची थिल्लर उपमा देणारे तुम्ही सर्वज्ञानी संजय राऊत हेच मुळात विदुषकी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहात. रोज सकाळी नऊच्या सुमारास घासून घासून रटाळ झालेली स्क्रीप्ट तुम्ही लोकांसमोर सादर करत असता.

अशा पडेल स्क्रीप्टवर बनणाऱ्या तुमच्या चित्रपटाचा चोथा होणार नाही तर दुसरे काय होणार? उगीच घिश्यापिट्या डायलॉगांच्या पिपाण्या वाजवण्यापेक्षा जबाबदारीने बोलणं कधीही चांगलं असतं.सर्वज्ञानी जी.”

Chief Minister and Deputy Chief Minister are involved in politics – Sanjay Raut

दरम्यान, राज्यामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

“महाराष्ट्रात सध्या मृत्यू तांडव सुरू आहे. मात्र, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना त्याची चिंता नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकारणामध्ये अडकलेले आहेत.

नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या लोकांच्या आक्रोशाकडे सरकारचे लक्ष नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.