Rohit Pawar | लोकसभा निवडणूक अहमदनगरमधून लढवणार? रोहित पवार म्हणतात…

Rohit Pawar | अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. रोहित पवार यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

I consider the people of Karjat-Jamkhed constituency as my family – Rohit Pawar

अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत करत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “कर्जत-जामखेड मतदार संघातील जनतेला मी माझं कुटुंब मानतो. त्यामुळं मी याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहे.

मात्र, मी फक्त आणि फक्त कर्जत-जामखेड मधूनच निवडणूक लढवणार आहे. काहीही झालं तरी विधानसभेचा हा मतदारसंघ सोडून मी जाणार नाही.

मला दिल्लीला जाण्यात रस नाही. कर्जत-जामखेडच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला आहे. त्याचबरोबर माझ्या कठीण काळात कर्जत-जामखेडचे लोक माझ्या पाठीशी उभे होते. या लोकांनी मला ओळख मिळवून दिली आहे.”

दरम्यान, आज (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे:

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

महत्वाच्या बातम्या