Jayant Patil | सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे-फडणवीस नक्की कोणाची प्रगती करणार होते? – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकास कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे.

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते?, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

For the Mahavikas Aghadi, the development of Maharashtra was and is the focus – Jayant Patil 

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती.

यामध्ये अगदी गावाच्या छोट्या पाणंद रस्त्यापासून ते राज्य महामार्ग, शासकीय इमारती अशा शेकडो प्रकारच्या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता.

उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांमध्ये निर्णय देताना राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. याबद्दल मा. उच्च न्यायालयासमोर उर्वरित प्रलंबित याचिकांमध्ये राज्य सरकारने स्वतःहून सर्व स्थगिती सरसकट उठवली आहे.

आम्ही न्यायालयात गेलो नसतो तर राज्य सरकारने ही स्थगिती कधीच उठवली नसती. राज्य सरकारने स्थगिती उठवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा करतो.

लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास होता आणि आहे. जय महाराष्ट्र!”

दरम्यान, या प्रकरणावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हाय कोर्टाने खडे बोल सुनावल्यानंतर मंजूर केलेल्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा.

पण गेले वर्षभर ही कामं बंद असल्याने या कामाच्या खर्चात वाढ होणार आहे आणि त्याचा भार अर्थातच सरकारी तिजोरीवर म्हणजेच सामान्य लोकांवरच पडणार असून त्याला जबाबदार कोण? शिवाय कामं न झाल्याने सामान्य लोकांची जी गैरसोय झाली ती वेगळीच.

यावरून विरोधी पक्षाचा केवळ द्वेष करत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारं हे सरकार आता लोकांसाठी मात्र बोजा ठरतंय हे स्पष्ट होतं. आता स्थगिती उठवलीच आहे तर स्थगितीमुळं रखडलेल्या कामांना तातडीने पुरेसा निधीही दिला पाहीजे.

माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड येथील हॉस्पिटलचं काम ४० टक्के पूर्ण झालं तरी त्याला निधी दिला जात नाही, ही एकप्रकारे अघोषित स्थगितीच आहे. तीही उठवली पाहीजे अन्यथा योग्य उपचारांअभावी गरीबांचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.