Uday Samant | वाघ नखं जवळून बघितल्यावर काय झालं? उदय सामंत म्हणाले…

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुढाकारामुळे मला लंडनमध्ये उपस्थित राहून वाघ नखं बघण्याची संधी मिळाली असल्याची उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde’s rebellion has angered many people – Uday Samant 

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन अनेकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अनेकांना त्यांचा राग आला आहे. मात्र, मी तेव्हा त्यांची साथ सोडली असती तर आज मी राज्याचा उद्योग मंत्री बनलो नसतो.

तेव्हा मी त्यांना साथ दिली, त्यामुळे मी आज राज्य सरकारमध्ये काम करत आहे. यापूर्वी कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नख लंडनमधून महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न झाला नव्हता.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पुढाकारामुळे वाघ नखं महाराष्ट्रात येत आहे. येत्या काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वाघ नखं महाराष्ट्रात येणार आहे.”

पुढे बोलताना ते (Uday Samant) म्हणाले, “जेव्हा मी जवळून छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वाघ नख पाहिले, तेव्हा महाराजांचा इतिहास आठवून अंगावर शहारे उभे राहिले होते.

महाराजांच्या वाघ नखांबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. महाराजांनी वापरलेले वाघ नख असा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. याचा सगळ्यांनाच अभिमान आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.