Devendra Fadnavis | अजित पवार मोठे नेते, मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा – देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

राज्य सरकारमध्ये सामील होताच अजित पवार राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहे. त्यामुळे त्यांना कधी ना कधी कुठे ना कुठे संधी मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath Shinde is the Chief Minister and will remain the Chief Minister – Devendra Fadnavis

अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) त्यांना पाठिंबा आहे, असा सवाल प्रसारमाध्यमांनी फडणवीस यांना विचारला.

यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे लोक राजकारणात आहे, त्यांना कधी ना कधी कुठे ना कुठे संधी मिळणार आहे. अजित पवार त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहे. त्यामुळे आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे.

मात्र, त्याचबरोबर सर्वांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. एकनाथराव शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहे आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.”

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

दिल्लीने फडणवीसांचं मातेरं आणि पोतेरं केलं आहे. म्हणून आम्हाला त्यांची दया येते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विट करत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना खोटारडा कोण म्हणतोय?

… तर ज्याने कोविडमध्ये लोकांच्या मृत्युतून सुद्धा दलाली खाल्ली,
… ज्याने पत्राचाळ घोटाळ्यातून अनेक गरिबांच्या घशातील घास आपल्या घशात घातला.
… ज्याने शिवसेनेची वाट लावली
… ज्याने राष्ट्रवादीची सुद्धा वाट लावली
… जो आरोप खुद्द शरद पवार नाकारू शकत नाहीत, तेथे तुमची काय गत?
… खोट्या आणि कोत्या मनुवृत्तीच्या उद्धव ठाकरेंचे समर्थन करताना तुमचा रोज पोपट होतो. स्वतःचेच आणखी पतन करणार?”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe