Uday Samant | उदय सामतांचं आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर; मांडला परदेशी दौऱ्याचा खर्च

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परदेशी दौऱ्यावरून उदय सामंत आणि राज्य सरकारवर टीका केली होती.

जनतेच्या पैशावर उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी सहलीसाठी जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांनी त्यांच्या परदेशी दौऱ्याचा संपूर्ण हिशोब सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Who paid for my trip to London? – Uday Samant

ट्विट करत उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “माझ्या लंडन दौर्‍याचा खर्च कोणी केला? त्याचे उत्तर सोबत आहे. २७ सप्टेंबर २३ रोजी ट्रॅव्हल कंपनीला दिलेला धनादेश आणि त्याची पोच पावती सुद्धा आहे.

संपूर्ण दौऱ्यात राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च देखील मी स्वतः केलेला आहे. पण मी विचारलेल्या २०२२ च्या दावोस दौऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत पण असो आता मी ते विचारणार नाही.

जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संबंधितांनी त्याची उत्तरे द्यावी..माझ्यासाठी हा विषय संपला आहे. महाराष्ट्र २०१९ नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी महायुती सरकार कसोशीने प्रयत्न करणार.”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्या परदेशी दौऱ्यावर टीका केली होती. ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार?

जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका.

• लंडन आणि म्युनिक मधील राऊंड टेबल कॉन्फरन्स ला कोण हजेरी लावणार आहे?

• लंडनमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ ची बैठक कोणी आयोजित केली आहे?

• दावोस ला वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चा कोणीही प्रतिनिधी आत्ता नसताना आणि तिथे काहीच सुरु नसताना, नक्की कसली पहाणी करणार आहात?

आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? महाराष्ट्राच्या जनतेचं तुमच्या दौऱ्यावर लक्ष असेलच! आपल्या सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर, चला चर्चा करूया आपण शेतकऱ्यांच्या मदतीची आणि जून्या पेन्शन योजनेची!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.