Mla Disqualification | शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार निर्णय

Mla Disqualification | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या अपात्र आमदारांची सुनावणी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलं झापलं होतं.

त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरल्याची माहिती मिळाली होती. अशात पुन्हा एकदा ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

9 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती. परंतु, ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

The hearing will be held directly on November 3

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 अपात्र आमदारांची सुनावणी पुन्हा एकदा लांबली आहे. यापूर्वी ही सुनावणी 3 ऑक्टोबर, त्यानंतर 6 ऑक्टोबर आणि नंतर 9 ऑक्टोबरला होणार होती.

या तारखानंतर आता ही सुनावणी थेट 3 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा महिनाभर पुढे ढकलल्याने ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या विरोधात आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं आहे. त्यानंतर ही सुनावणी सुरू आहे.

या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. अशात पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.