Bacchu Kadu | हिंगोली: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात.
अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष मित्र म्हणून जवळ घेतो आणि नंतर अफजलखानासारखी मिठी मारतो, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हिंगोलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम करत आहे. आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे.
भारतीय जनता पक्ष मित्र म्हणून जवळ घेतो आणि नंतर अफजलखानासारखी मिठी मारतो, असं मला वाटतं. मात्र, हे चांगलं नाही. अनिल बोंडे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचलपूर मतदारसंघात लक्ष द्यायला सांगितलं आहे.
परंतु, बोलून देखील कोणी लक्ष घालत नाही. सरकारमध्ये सामील व्हा, असं हे एकीकडे सांगत आहे. पण सत्तेत सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका मांडायची. हे कुणासाठी चांगलं नाही.”
Devendra Fadnavis is humiliating himself – Sanjay Raut
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणावरून तुरुंगात टाकणार होते. पण सध्या ते त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे.
शिंदे गटातील 25 पेक्षा जास्त नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहे. ते देखील तुमच्या बाजूला येऊन बसले आहे. त्यांनी आमच्या विषयी न बोलता त्यांच्याविषयी बोलायला हवं. देवेंद्र फडणवीस स्वतःचा अपमान करून घेत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची दया येते.”
महत्वाच्या बातम्या
- Ashish Deshmukh | खोटारडे देवेंद्र फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे – आशिष देशमुख
- Amol Mitkari | भाजपमध्ये असताना नाना पटोले मलाई खायचे – अमोल मिटकरी
- Aditya Thackeray | “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तर करा, पण…”; आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं
- Devendra Fadnavis | अजित पवार मोठे नेते, मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा – देवेंद्र फडणवीस
- Uday Samant | उदय सामतांचं आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर; मांडला परदेशी दौऱ्याचा खर्च