Share

Ashish Deshmukh | खोटारडे देवेंद्र फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे – आशिष देशमुख

🕒 1 min read Ashish Deshmukh | चंद्रपूर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्द टीका केली. देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडे आहे, ते रेटून खोटे बोलतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला आशिष देशमुख … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ashish Deshmukh | चंद्रपूर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्द टीका केली.

देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडे आहे, ते रेटून खोटे बोलतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला आशिष देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खोटारडे आहे, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

चंद्रपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले, “उद्धव ठाकरे खोटारडे आहे. 2019 मध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यात आली.

त्यावेळी मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचा हक्क होता. मात्र, खोटे बोलून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळं खोटारडं कोण आहे? हे सर्वांनाच माहित आहे.

Devendra Fadnavis is an extreme liar – Ashish Deshmukh

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडे आहेत. खोटे बोलून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर चिखलफेक करत असतात.

सिंचन घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते. मात्र, ते आता त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे. त्यांनी त्याविषयी बोलायला हवं.

परंतु, ते आमच्यावर आरोप करतात. देवेंद्र फडणवीस स्वतःचा अपमान करून घेत आहे. म्हणून आम्हाला त्यांची दया येते.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही