Amol Mitkari | भाजपमध्ये असताना नाना पटोले मलाई खायचे – अमोल मिटकरी

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: काल (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार अजित पवारांना (Ajit Pawar) पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.

सर्व सत्ताधारी मलाईसाठी एकत्र आले असल्याचं  नाना पटोले यांनी म्हटलं होतं. नाना पटोले यांच्या या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “भारतीय जनता पक्षामध्ये असताना नाना पटोले सुद्धा मलाई खात होते. त्यांना दिल्लीत काय किंमत आहे? हे त्यांना चांगलंच माहित आहे. विरोधासाठी काहीतरी बोलायचं म्हणून ते अशा प्रकारचे विधान करत असतात.”

There is a lot of confusion in the state government right now – Amol Mitkari

दरम्यान, नाना पटोले (Nana Patole) यांनी खोचक शब्दात राज्य सरकारवर टीका केली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्य सरकारमध्ये सध्या अत्यंत गोंधळ आहे. या ठिकाणी सगळे एकमेकांना ओढताना दिसत आहे. त्याचबरोबर हे सगळे मलाईसाठी एकत्र आले आहे.

राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीकडे राज्य सरकार गांभीर्याने बघत नाही. सत्ताधारी सध्या जनतेच्या घामाचे पैसे लुटत आहे. महाराष्ट्रासाठी हे खूप मोठे दुर्दैव आहे.”

राज्यामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; नांदेड, औरंगाबादनंतर आता नागपूर हादरलं, 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरा ची हुजरेगिरी करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. राज्यात प्रचंड प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.येड्या सरकार च्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत.महाराष्ट्रातील लोकांचे जीव जात आहेत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे लोकसभेच्या निवडणूक तयारीच्या पक्ष बैठकीत व्यस्त आहेत”, असं पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe