Narendra Modi | PM मोदींच्या जीवाला धोका; मेलद्वारे मुंबई पोलिसांना दिली धमकी
Narendra Modi | मुंबई: देशाच्या राजकीय वर्तुळातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा मेल मुंबई पोलीस नियंत्रक पक्षाला आला आहे. मोदींच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर घातपात करण्याची धमकी देखील या मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे. तर दुसरीकडे या माहितीनंतर देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आपल्या देशामध्ये सगळं काही विकलं जात आहे. त्यात आम्ही देखील काहीतरी विकत घेतलं आहे. तुम्ही कितीही सुरक्षा वाढवली तरी त्यांना आमच्यापासून वाचवू शकत नाही, असं या मेलमध्ये म्हटलं आहे.
हा धमकीचा मेल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. तर धमकी देणाऱ्याने सरकारकडे पाच कोटी आणि गुंड लॉरेन्स बिष्णोईची मागणी देखील केली आहे.
मागणी पूर्ण न झाल्यास नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह त्यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर घातपात केला जाईल, असं देखील या मेलमध्ये म्हटलं आहे.
05 ऑक्टोबर (गुरुवारी) सकाळी दहाच्या सुमारास हा धमकीचा मेल मुंबई पोलिसांच्या शासकीय मेल आयडीवर आला असल्याची माहिती मिळाली आहे.
Police is investigating an unknown person who threatened Narendra Modi through mail
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मेलद्वारे धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस तपास करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला योग्य ती शिक्षा होईल.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यासह काही नेत्यांना धमकीचे फोन आले होते. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या माहितीनंतर राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | राष्ट्रवादी कुणाची? आज होणार निवडणूक आयोगापुढं सुनावणी
- Sanjay Raut | यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेय – संजय राऊत
- Uddhav Thackeray | राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार; ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका
- Shalini Thackeray | “…तर मनसे तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजल्याशिवाय राहणार नाही”; शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा
- Mla Disqualification | शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार निर्णय