Sanjay Raut | यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात देखील अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. राज्यात या घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते.

नक्षलवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

More than a hundred people have died in the state in the last four days – Sanjay Raut

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, “नक्षलवादाचं नाव घेऊन हे दिल्लीला जात असले तरी कारण वेगळी आहेत. नक्षलवादाच्या बैठकीसाठी ते येऊन जाऊ शकतात.

मात्र, राज्यात गेल्या चार दिवसांत नक्षलवादी हल्ल्याशिवाय शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा गंभीर विषय जर मुख्यमंत्र्यांच्या मनाला अस्वस्थ करत नसेल, तर मला असं वाटतं की त्यांचं हृदय आणि मन मेलेलं आहे.

ते दिल्लीत मन की बात ऐकायला येतात. मात्र, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सुरू असलेल्या जनतेचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही.

महाराष्ट्रामध्ये सध्या एक यमाचा रेडा फिरत आहे आणि त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत.”

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे.

यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मोजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते.

पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे.

या राज्यात आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण शासकीय इस्पितळात औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल. शेमा शेमा शेमा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.