Shubman Gill | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिलला झाली डेंग्यूची लागण

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात काल (05 ऑक्टोबर) झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली.

या स्पर्धेमध्ये भारत आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या तूफान  फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Indian team will play their first match against Australia on October 8

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

कारण टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) डेंग्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. गिलच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलने 2023 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राहुल द्रविड रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत इशान किशनला (Ishan Kishan) सलामीसाठी पाठवू शकतो.

सलामीवीर म्हणून इशान किशनने आतापर्यंत चांगल्या धावा केल्या आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने 40 च्या सरासरीने धावा करत वनडेमधील त्याचे पहिले शतक केले होते. त्यानंतर इशान किशन आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सलामीसाठी मैदानात उतरू शकतो.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.