Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
औषधांच्या कमतरतेमुळे आणि सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. राज्य सरकारकडे मजा मस्ती करायला पैसे आहे मात्र रुग्णांसाठी पैसे नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे त्यांनी केलेला औषधांचा काळाबाजार विसरले असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “नांदेडमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहेच. पण विरोधी पक्षांनी याचं राजकारण करण्याचा जो घाणेरडा प्रकार चालवला आहे ते जास्त दुर्दैवी आहे.
बहुतेक उद्धवजींना जरा स्मृतिभ्रंश होतोय. कारण नांदेड वर जीव तोडून टीका करत असताना आणि कोविड काळात त्यांनी (न केलेलं) काम कसं केलं हे रेटून सांगताना ते त्याच कोविड काळात त्यांनी केलेली लूट सांगायचं विसरतायत. लोकांच्या मृत्यूचा बाजार केला हे ते विसरलेत.
लोक मरायला टेकले असताना त्यांनी केलेला औषधांचा काळा बाजार ते विसरलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात ते त्यांच्या खुर्चीतून उठले सुद्धा नव्हते जनतेच्या रक्षणार्थ, हे सुद्धा ते विसरले. त्यामुळे उद्धव जी एवढं खोटं प्रेम दाखवू नका. जनता तुम्हाला चांगलं ओळखून आहे ! मृत्यूचं राजकारण करू नका !”
There is a shortage of medicines everywhere in the state – Uddhav Thackeray
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. ते म्हणाले, “मंत्री म्हणतात, राज्यात औषधांचा तुटवडा नाही. मात्र, राज्यामध्ये सर्वत्र औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
कोरोना काळामध्ये राज्यात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. मात्र, आज कोणताही साथीचा रोग नसताना राज्यात औषधांची कमतरता भासत आहे. राज्यात आज भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे.
या सरकारकडे स्वतःच्या जाहिरातींसाठी पैसा आहे. गोवा, गुवाहाटी, गुजरातला जाऊन मजा मस्ती करण्यासाठी या शासनाकडे पैसा आहे. मात्र, रुग्णांसाठी यांच्याकडे पैसे नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे, मात्र रुग्णांसाठी नाही – उद्धव ठाकरे
- PM Kisan Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लवकर करा ‘या’ गोष्टी
- Shubman Gill | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिलला झाली डेंग्यूची लागण
- Chitra Wagh | तुमच्या भ्रष्टाचारामुळे रेड्यांची पलटण राज्याच्या मानगुटीवर बसली; चित्रा वाघांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- Narendra Modi | PM मोदींच्या जीवाला धोका; मेलद्वारे मुंबई पोलिसांना दिली धमकी