Share

Uddhav Thackeray | मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे, मात्र रुग्णांसाठी नाही – उद्धव ठाकरे

🕒 1 min readUddhav Thackeray | मुंबई: नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधी पक्षानं म्हटलं आहे.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका झटक्यात पेट्रोल-डिझेल होणार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई: नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.

औषधांच्या कमतरतेमुळे आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधी पक्षानं म्हटलं आहे.

अशात आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. या सरकारकडे मजा मस्ती करायला पैसे आहे. मात्र, रुग्णांसाठी पैसे नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

There is a shortage of medicines everywhere – Uddhav Thackeray

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात औषधांचा तुटवडा नाही, असं सरकार सांगत आहे. मात्र, सर्वत्र औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

चंद्रपूरमधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बाहेरून औषधी आणा, असं आम्हाला सांगितलं असल्याचं ही महिला या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. असं असेल तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना काय कामाच्या?

कोरोना कालावधीमध्ये कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. मात्र, आज कोणतीही साथ नसताना औषधांची कमतरता भासत आहे. आज फक्त भ्रष्टाचाराची साथ आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “सकाळी गोरेगावमध्ये दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच मदत जाहीर केली. परंतु फक्त मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करणे पुरेसं आहे का? या सरकारकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसा आहे.

गुजरात, गोवा, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे. पण, महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे या सरकारची आता निपक्षपणाने सीबीआय चौकशी व्हायला हवी असं मला वाटतं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!