PM Kisan Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लवकर करा ‘या’ गोष्टी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते.

हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जाते. तुम्हाला देखील केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील गोष्टी व्यवस्थितरीत्या करून घ्याव्या लागतील.

Farmers need to do land verification and e-KYC to avail the benefits of this scheme

प्रधानमंत्री किसान योजनेसाठी (PM Kisan Yojna) नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचे नाव, आधार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती अचूक पद्धतीने भरावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती योग्य पद्धतीने टाकावी लागेल.

बँक खात्याची माहिती जर चुकली तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना जमिनीची पडताळणी आणि ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या गोष्टी केल्या नाही त्यांनी या लवकरात लवकर करून घ्यावा. https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन शेतकरी ई-केवायसी करू शकतात.

पीएम किसान योजनेसंबंधी (PM Kisan Yojna) अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या समस्या 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर फोन करून नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.