Chandrashekhar Bawankule | उद्धवजींनी मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लंय – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयाच्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

राज्य सरकारकडे मजा मस्ती करायला पैसे आहे. त्याचबरोबर या सरकारकडे गोवा, गुवाहाटी आणि गुजरातला जाण्यासाठी पैसे आहे. मात्र, यांच्याकडे रुग्णांसाठी पैसा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Uddhavji remember the loot you did in Covid – Chandrashekhar Bawankule

ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा.

आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं.

मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे!

उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं.

पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! उद्धवजी , तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही?”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.