🕒 1 min read
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर, तर विदर्भातील नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांना दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
सत्ताधारी पक्षाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली होती.
गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का?
गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Everyone’s life in the state is important for us – Chitra Wagh
ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “राज्याच्या “मोठ्ठ्या ताई” (सुप्रिया सुळे) २ दिवसापासून राज्यसरकारवर टीवटीव करतांना दिसताहेत.. कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला.
झालेली घटना दुदैवी आणि वाईटचं यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाहीच याबाबत आपण निश्चींत रहा … राज्यातील प्रत्येकाचा जीव आमच्या साठी महत्वाचा आणि राज्यसरकार मजबुतीने ठाम पणे पिडीत परीवारांच्या सोबत उभं आहे.
शिवाय पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी ही उपाययोजना केली जाईल मविआ काळात घडलेलं भंडारा अग्नीकांड विसरलात का हो तुम्ही ताई ?
११ नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला ? त्या तुमच्या मविआ काळात राज्यातील वेगवेगळ्या ठीकाणी अग्नीकांड झाले ज्यात कित्येक माणसं दगावलीत तरी ही त्यावेळच्या तुमच्या पक्षाच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई ?
तिथं ना स्मोक डिटेक्टर बसवले होते, ना अग्निरोधक यंत्रणा. तेव्हा तोंडदेखली मलमपट्टी म्हणून तुम्ही राज्यातल्या सगळ्याचं हॉस्पिटल चे ऑडीट करण्याचे आदेश दिले पण, तुमच्या इतर आश्वासनांसारखं ऑडिटही हवेतच विरून गेलं.
टीका करणं हा तुमचा अधिकार आहे पण आताचं महाराष्ट्रातील महायुतीच सरकार action mode मधलं सरकार आहे ताई ते तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय ताई. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन उपाययोजनाही केल्या जाताहेत पण, तरीही तुमचे राज सरकारवर बेछूट आरोप सुरूच आहेत.
कारण, कोमात गेलेल्या तुमच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठी या घटनेतूनच सलाईन मिळतंय. खरयं ना कोरोना काळात ऑक्सिजन आणि औषधांअभावी रूग्ण तडफडत असताना तुम्ही मात्र नाकर्त्यासारखे सत्तेच्या गादीला जळवांसारखे चिकटून होतात.
आणि, तत्कालीन मुख्यमंत्री पालीसारखे मातोश्रीच्या भिंतींना चिकटून होते. ते घराबाहेर पडलेच नाहीत कधी. राज्याची आरोग्ययंत्रणा कार्यक्षम बनवण्याचा तुमचा राजकारणी वादा हवेतचं विरला राजकारण आपल्या जागी आहे, पण तुमचा कळवळा तरी खरा असू द्या. ‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती..’ हे तुकोबांचं वचन लक्षात ठेवा आणि मग राजकारण करा. मोठ्ठ्या ताई
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | केंद्र सरकारला मोठा झटका! पीएम किसान योजनेत आढळले तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी
- Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना स्मृतीभ्रंश झालाय; भाजपची खोचक टीका
- Uddhav Thackeray | मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे, मात्र रुग्णांसाठी नाही – उद्धव ठाकरे
- PM Kisan Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लवकर करा ‘या’ गोष्टी
- Shubman Gill | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिलला झाली डेंग्यूची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











