Share

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! येत्या 48 तासांत ‘या’ जिल्ह्यात कोसळणार परतीचा पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे राज्यातील नागरिकांना उकड्याला  सामोरे जावे लागत आहे. अशात हवामान खात्याने वातावरणाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे राज्यातील नागरिकांना उकड्याला  सामोरे जावे लागत आहे.

अशात हवामान खात्याने वातावरणाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

There is a possibility of return of rain in most parts of the state

राज्यातील 45 टक्के भागातून मान्सून पुढे निघून गेला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. परिणामी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

पुणे, मुंबई, नागपूर यांच्यासह गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर सांगली, सातारा, नंदुरबार, नाशिक, जळगाव धुळे या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ या भागातून मान्सून परतला आहे. या परतीच्या पावसाचा वेग येत्या दोन-तीन दिवसात आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही