Government Scheme | शासनाच्या ‘या’ योजनेअंतर्गत शेतकरी दरमहा मिळवू शकतात 3 हजार

Government Scheme | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते.

शेतकऱ्यांना आर्थिक सहारा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देते.

Farmers aged 18 to 40 can apply for PM Kisan Mandhan Yojana

केंद्र सरकारच्या पीएम किसान मानधन योजनेसाठी (Government Scheme) 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. तर या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते.

वयाच्या 18 व्या वर्षी अर्ज केल्यास दरमहा 55 रुपये, तर 40 व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर तुमचं वय 60 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारच्या या योजनेचा (Government Scheme) लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. खालील पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात.

  • सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला उमेदवाराची आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला सांगितलेल्या जागी प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढावी लागेल.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.