Share

Sanjay Raut | राज्य सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीत – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरलं आहे.

याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

More than 150 people have died in these 08 days – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज्य शासनाच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीतील लोक तो नाडा कधीही सोडतात आणि कधीही ताणतात.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सतत दिल्लीला पळत असतात. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये लोक मरत आहेत. दीडशे पेक्षा अधिक लोकांचा या 08 दिवसांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन बसले आहे. नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत गेले आहे. जेवढ्या लोकांचा नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू झाला नाही तेवढे लोक गेल्या आठ दिवसात रुग्णालयात दगावले आहे. या लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे?

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला बेहाल आहेत. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरूच आहे. या सर्व तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री.

लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत.

कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात पडली आहेत, पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही