Vijay Wadettiwar | हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच राज्यातील बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार मंत्री हसन मुश्रीम यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्री पद गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Nine ministers from the Ajit Pawar group will have to be ousted – Vijay Wadettiwar 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “येत्या पंधरा दिवसांमध्ये अजित पवार गटातील नऊ मंत्र्यांची हकलपट्टी करावी लागणार आहे.

त्यांनी गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार केलेला असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे. सरकार या नऊ मंत्र्यांना काढणार नसेल तर यांचे घोटाळे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत.

जे मंत्री शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळतात, त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्य सरकार थोडं जरी इमानदार असेल, त्याचबरोबर शासनाला शेतकऱ्यांबद्दल थोडं जरी काही वाटत असेल, तर राज्य सरकार त्वरित हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घेईल.”

यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इंडिया आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र दिल्लीतच ठरणार आहे.

काल झालेली इंडिया आघाडीची बैठक अत्यंत सकारात्मक बैठक होती. ही बैठक इंडियाला मजबुती प्रदान करणारी होती. जागा वाटपाच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.