Share

IND vs AFG | भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे थांबला; 18.2 षटकानंतर आली बाधा

IND vs AFG | टीम महाराष्ट्र देशा: 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना सुरू आहे. चीनच्या हांगझोऊ येथे हा सामना सुरू आहे. हा सामना सुरू असताना पाऊस सुरू झाला आहे.

त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. 18.2 षटकानंतर अफगाणिस्तान संघाची धावसंख्या 112 आहे. तर त्यांचे पाच गडी बाद झाले आहे. यानंतर पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे.

काल (06 ऑक्टोबर) झालेल्या उपांत्य फेरीमध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा 09 गडी राखून पराभव केला आहे. त्यानंतर भारतीय संघाला सुवर्णपदकेच्या लढाईत प्रवेश मिळाला आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानचा 04 गडी राखून पराभव करून अफगाणिस्तानने अंतिम फेरी गाठली आहे. त्यानंतर आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सुवर्णपदक सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान पाऊस आल्याने हा सामना थांबवण्यात आला आहे.

The ICC ODI World Cup 2023 has started from October 5

दरम्यान, 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात झाली आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या तूफान फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो हा सामना खेळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

IND vs AFG | टीम महाराष्ट्र देशा: 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना सुरू …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now