Share

Team India च्या अडचणीत वाढ, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बदलणार कर्णधार; नेमकं कारण काय?

Team India vs New Zealand match will be held on March 2. But, before this match, the problem of Team India has increased.

by MHD

Published On: 

Team India captain Rohit Sharma injured during Champions Trophy

🕒 1 min read

Team India । टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. संघाने साखळी फेरीत बांगलादेश आणि त्यानंतर पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2 मार्चला टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) असा सामना होणार आहे.

परंतु, या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. रिपोर्टनुसार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजीच्या सरावादरम्यान थ्रो डाउन घेण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती.

विराट कोहली (Virat Kohli) हा आगामी सामन्यात कर्णधार होऊ शकतो. कारण उपकर्णधार शुभमन गिलची (Shubman Gill) देखील तब्येत ठीक नाही. टीम इंडियाचे फक्त कर्णधारपद बदलणार नाही तर सलामी जोडीमध्येही बदल होईल. रोहितच्या जागी केएल राहुल सलामीला येऊ शकतो.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन स्टार खेळाडूबाबत संघ व्यवस्थापन कोणतीही जोखीम पत्करणार नाही. जर या दोन्ही खेळाडूंना विश्रांती मिळाली तर ते दुखापतीतून लवकर बरे होऊ शकतात. नाहीतर ते दोघेही आगामी सामन्यासाठी खेळू शकणार नाहीत.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ICC Champions Trophy 2025 Match Where To Watch On TV?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वर होणार आहे.

ICC Champions Trophy 2025 Match Live Streaming Details

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Team India for Champions Trophy 2025

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Sports Cricket Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या