Delhi Capitals । अवघ्या काही दिवसांवर आयपीएल (IPL 2025) येऊन ठेपली आहे. प्रत्येक संघ आपला कर्णधार घोषित करत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) मैदानात अनेक नवीन खेळाडू दिसतील. त्यांच्या कामगिरीकडे संघांचे विशेष लक्ष असणार आहेत.
अशातच दिल्ली कॅपिटल्समध्ये केविन पीटरसनची (Kevin Pietersen) एन्ट्री झाली आहे. केविन पीटरसन आता नवीन भूमिकेत दिसेल. तो दिल्ली कॅपिटल्सचा मेन्टॉर (Delhi Capitals Mentor) असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून आगामी आयपीएलसाठी हेमांग बदानी यांना त्यांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
इंग्लंडचे व्हाईट बॉल प्रशिक्षक असलेले मॅथ्यू मॉट सहाय्यक प्रशिक्षक तर भारतीय संघाचे अनुभवी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल यांची संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
इतकेच नाही तर वेणुगोपाल राव क्रिकेट संचालकाची जबाबदारी सांभाळत असून अशातच आता आता केविन पीटरसनचा देखील या कोचिंग स्टाफमध्ये समावेश झाला आहे. त्याची आयपीएलमध्ये पीटरसनची ही पहिली कोचिंग असाईनमेंट असणार आहे.
तो 2011 मध्ये लीगमध्ये खेळला होता. त्याने आयपीएल व्यतिरिक्त बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला. एकूणच त्याने 200 टी 20 खेळले असून सरासरी 33.89 आणि 137 च्या स्ट्राइक रेटने 5695 धावा केल्या.
Delhi Capitals performance in IPL
IPL 2008: सेमी फायनल
IPL 2009: सेमी फायनल
IPL 2010: लीग स्टेज
IPL 2011: लीग स्टेज
IPL 2012: प्लेऑफ
IPL 2013: लीग स्टेज
IPL 2014: लीग स्टेज
IPL 2015: लीग स्टेज
IPL 2016: लीग स्टेज
IPL 2017: लीग स्टेज
IPL 2018: लीग स्टेज
IPL 2019: प्लेऑफ
IPL 2020: रनरअप
IPL 2021: प्लेऑफ
IPL 2022: प्लेऑफ
IPL 2023: प्लेऑफ
IPL 2024: प्लेऑफ
Delhi Capitals Full Schedule in IPL 2025
24 मार्च : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
30 मार्च : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
5 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
10 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी
13 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
16 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
19 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
22 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
27 एप्रिल : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध आरसीबी
29 एप्रिल : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
5 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
8 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स
11 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
Delhi Capitals team for IPL 2025
अक्षर पटेल, कुलदीप यादव, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, हैरी ब्रूक, जेक फ्रेजर-मैकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नालकांडे, वी. निगम, दुष्मंथा चमीरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मनवंत कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :