Share

अनुभव कमी तरीही ‘हा’ खेळाडू करणार रोहित शर्मासोबत ओपनिंग, काय आहे Mumbai Indians चं गणित?

by MHD
Naman Dhir will be Rohit Sharma opening partner in Mumbai Indians team

Mumbai Indians । आयपीएलपूर्वीच (IPL 2025) मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात मोठा बदल केला आहे. आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) संघाने कर्णधारपद सोपवले आहे. परंतु, त्याच्यावर पहिल्या सामन्यात बंदी असल्याने त्याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) संघांचे नेतृत्व करेल.

अशातच आता मुंबई इंडियन्सच्या सलामीच्या जोडीबद्दल माहिती समोर येत आहे. रोहित शर्माबरोबर कोणता खेळाडू ओपनिंग करेल हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. खरं तर, संघाने रोहित शर्मासमवेत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना कायम ठेवले होते. अशा परिस्थितीत, संघाकडे सध्या सलामीच्या स्लॉटवर खेळण्यासाठी काही पर्याय आहेत.

या यादीमध्ये पहिल्या स्थानी सूर्यकुमार यादवचा समावेश आहे. तो पॉवरप्लेचा चांगला वापर करण्यात खूप पटाईत आहे. तसेच तिलक वर्मा देखील ओपनिंगला येऊ शकतो. या दोन खेळाडूंशिवाय तरुण खेळाडू नमन धीर (Naman Dhir) हा देखील संघाकडे एक पर्याय आहे.

नमन धीर याला सलामीवीर म्हणून रोहित शर्मासमवेत पाठवले जाऊ शकते. नमन धीरला अजूनही तितका अनुभव नाही, परंतु रोहित शर्माबरोबर खेळल्याने नमन धीरला अनुभव मिळेल.

याव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रायन रिकल्टन रोहित शर्मासह ओपनिंगला जाऊ शकतो. या चौघांपैकी संघ कोणालाही ओपनिंगला पाठवू शकतो, गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहची जोडी पुन्हा एकदा मैदानावर दिसून येईल.

IPL 2025 Mumbai Indians Complete Schedule

1) 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नईशी मुंबईत होणार आहे.
2) 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्सशी गुजरातमध्ये होणार आहे.
3) 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी मुंबईत होणार आहे.
4) 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत लखनौमध्ये होणार आहे.
5) 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे.
6) 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सहावा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर दिल्लीत होणार आहे.
7) 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सातवा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत मुंबईत होणार आहे.
8) 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत होणार आहे.
9) 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा नववा सामना सनरायझर्स हैदराबादशी हैदराबादमध्येच होणार आहे.
10) 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा दहावा सामना लखनौ सुपर जायंट्सबरोबर मुंबईत होणार आहे.
11) 1 मे रोजी मुंबई इंडियन्सचा अकरावा सामना राजस्थान रॉयल्सशी राजस्थानमध्येचे होणार आहे.
12) 6 मे रोजी मुंबई इंडियन्सचा बारावा सामना गुजरात टायटन्सशी मुंबईत होणार आहे.
13) 11 मे रोजी मुंबई इंडियन्सचा तेरावा सामना पंजाब किंग्जशी पंजाबमध्येच होणार आहे.
14) 15 मे रोजी मुंबई इंडियन्सचा चौदावा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मुंबईत होणार आहे.

Mumbai Indians Squad For IPL 2025

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, दीपक चाहर, विल जॅक्स, मुजीब उर रहमान, मिचेल सँटेनर, रायन रिकल्टन, लिझाड विल्यम्स, रिस टोप्ली, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब्स, वेंकट सत्यनारायण पेन्मेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ कृष्णा, अश्विनी कुमार.

महत्त्वाच्या बातम्या :

Information about the opening pair of Mumbai Indians team. Fans want to know which player will open with Rohit Sharma.

Cricket IPL 2025 Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now