Share

Devendra Fadnavis | मी प्रतिक्रिया द्यावी, एवढे संजय राऊत मोठे नाही – देवेंद्र फडणवीस

🕒 1 min read Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने दिल्लीला पळत असतात.  कारण राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीतील नेते तो नाडा कधीही ताणतात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने दिल्लीला पळत असतात.  कारण राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीतील नेते तो नाडा कधीही ताणतात आणि कधीही सोडतात.

देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्या डमरूच्या तालावर माकडासारखे नाचतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मदारी आणि माकडाचं उदाहरण देऊन संजय राऊत कदाचित त्यांच्या पक्षाची अवस्था सांगत असतील.

त्यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण माकड आहे, हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. मात्र, मी या विषयावर कधी बोलत नाही. मी प्रतिक्रिया द्यावी एवढे संजय राऊत मोठे नाही.”

Sanjay Raut does not use harsh words but dirty words – Sanjay Shirsat

दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत घणाघाती नाही तर घाण शब्द वापरतात.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डमरू वाजवतात तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्या तालावर नाचतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण, जेव्हा देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात, तेव्हा ही लोक फुगड्या खेळत होती का?

संजय राऊत यांच्यासारख्या नालायक माणसाने केलेल्या टीकेला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. ते सातत्याने ईडी सारख्या विषयावर बोलत असतात. कारण त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे, म्हणून ते सतत हे विषय काढत असतात”, असं संजय शिरसाट यांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही