Nawab Malik | नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, जामिनीला मिळाली 3 महिन्यांची मुदतवाढ

Nawab Malik | नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणास्तव त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला होता.

मात्र, या कालावधीमध्ये नवाब मलिक यांची तब्येत बरी झाली नाही. उपचारांसाठी त्यांना आणखीन कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा दिला आहे.

It will take some more time for Nawab Malik to recover

नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती ठीक होण्यासाठी आणखीन काही कालावधी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये मलिकांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला होता. मात्र, यादरम्यान त्यांची तब्येत सुधारली नाही. नवाब मलिक यांची किडनी अजूनही योग्य पद्धतीने काम करत नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजप-शिंदे सरकारसोबत हातमिळवणी केली.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला होता. त्यानंतर मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मात्र, नवाब मलिक यांनी अजून त्यांचा ठाम निर्णय सांगितलेला नाही. नवाब मलिक राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या