Share

सैफ अली खानने अमृता सिंगवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला होता? सत्य आलं समोर!

सैफ अली खान आणि अमृता सिंगच्या लग्नाबाबत आजही चर्चा होतात. आता धर्मांतराच्या मुद्द्यावर सैफने मोठं वक्तव्य केलं असून सत्य परिस्थिती सांगितली आहे.

Published On: 

Saif Ali Khan Revelation: अमृतावर धर्मांतरासाठी दबाव? सत्य काय?

प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात, पण जेव्हा प्रश्न धर्माचा येतो तेव्हा काय? बॉलिवूडचा (Bollywood) ‘नवाब’ सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांचं लग्न आजही चर्चेचा विषय ठरतं. 1991 मध्ये झालेलं हे लग्न आणि त्यानंतरचा घटस्फोट यावर अनेकदा तर्कवितर्क लढवले जातात. पण लग्नानंतर अमृतावर खरंच धर्म बदलण्यासाठी दबाव होता का? यावर आता खुद्द ‘छोटे नवाब’नेच मोठा खुलासा केलाय.

सैफ अली खानने आपल्या खासगी आयुष्यावर नेहमीच रोखठोक भाष्य केलंय. त्याची पहिली पत्नी अमृता सिंग असो किंवा सध्याची बेगम करीना कपूर, दोघीही हिंदू आहेत. सैफने एका जुन्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, “अमृताला (जिला तो प्रेमाने ‘डिंगी’ म्हणायचा) कधीही इस्लाम स्वीकारण्यासाठी मी बळजबरी केली नाही.” घरात प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. सैफची आई शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पतौडींशी लग्न करताना इस्लाम स्वीकारला होता, मात्र सैफने हाच नियम आपल्या पत्नींवर कधीच लादला नाही.

Saif Ali Khan Revelation

मुलांच्या संगोपनातही सैफने हाच समजूतदारपणा दाखवला. तो म्हणाला, “जेव्हा अमृता गुरुद्वारात जायची, तेव्हा मी सारा आणि इब्राहिमला सांभाळायचो.” 2004 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मुलांची कस्टडी अमृताकडे गेली, तरीही ती मुलांवर कोणत्याही एका धर्माचा पगडा नसावा याबद्दल सैफला खात्री होती.

सैफ आणि अमृताची लव्हस्टोरी (Love Story) एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती. वयात तब्बल 13 वर्षांचं अंतर आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केलं होतं. हे लग्न इतकं घाईत झालं की अमृताने जे हातात येईल ते कपडे घातले होते. विशेष म्हणजे, या लग्नाला मौलवीसोबतच एक शीख ग्रंथीही उपस्थित होता. प्रसिद्ध डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला या ‘निकाह’चे साक्षीदार होते. धर्माच्या भिंती ओलांडून झालेलं हे लग्न आजही सैफच्या पुरोगामी विचारांमुळे चर्चेत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही