Vaishnavi Sharma । सध्या १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचा (Women’s World Cup 2025) थरार सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान, दुबळे समजले जाणारे संघही तोडीसतोड सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच स्पर्धेत टीम इंडियाने मलेशियाच्या संघाला अक्षरशः घाम फोडला आहे. (India Women U19)
मलेशिया विरुद्ध (INDWU19 vs MLYWU19) सुरु झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मलेशिया संघाला केवळ ३१ धावा करता आल्या. याला कारण आहे टीम इंडियाची फिरकीपटू वैष्णवी शर्मा.
फिरकीपटू वैष्णवी शर्माने ४ षटकात अवघ्या ५ धावा देत ५ विकेट घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. वैष्णवीने तिच्या स्पेलमध्ये हॅटट्रिक घेतली आहे. तिने शेवटच्या षटकात सलग तीन चेंडूत तीन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Vaishnavi Sharma hattrick in Women World Cup 2025
मलेशियाविरुद्ध केलेल्या पराक्रमामुळे तिचे कौतुक केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे वैष्णवीचा हा डेब्यू सामना होता आणि पहिल्याच सामन्यात तिने ही अतिशय उत्तम केली आहे. यावेळी तिचा इकोनॉमी रेट हा 1.20 इतका होता. तसेच टीम इंडियाने 32 धावा 2.5 षटकात एकही विकेट न गमवता पूर्ण करत सामना आपल्या नावावर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :