Team India । उद्या दुबईमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Team India vs Pakistan) असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यांकडे संपूर्ण देशभराचे लक्ष असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे तर पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडिया विजयी होणार की पाकिस्तान (Pakistan) विजयाचे खाते उघडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. एकीकडे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्याची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे दुबईचे पीच (IND vs PAK pitch report) कोणत्या संघाला साथ देईल? याची चर्चा सुरु आहे.
दुबईच्या पीचबद्दल बोलायचे झाले तर हे पीच संथ असल्याने त्याचा गोलंदाजांना चांगलाच फायदा होईल. एकदा जर चेंडू जुना झाला की फलंदाजांना या पीचवर गोलंदाजांचा सामना करणे वाटते तितके सोपे नसणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. 11 सामन्यात टीम इंडिया सलग नाणेफेकीचा कौल गमवत आली आहे.
त्यामुळे आता 12 व्या सामन्यात टीम इंडिया नाणेफेकीचा कौल जिंकणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. जर टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकला नाही तर संघासाठी अडचणी वाढू शकतात. याचा फायदा पाकिस्तानला होईल.
Indian team probable Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या :