Walmik Karad । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण आहे ते म्हणजे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्याप्रकरण. अडीच महिने होऊन गेले तरी देशमुखांना न्याय मिळाला नाही. यासाठी येत्या 25 तारखेला मस्साजोगचे नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरेगाव येथील सरपंच बालाजी तांदळे (Balaji Tandale) यांनी अशातच आता एक खळबळजनक विधान केले आहे. “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) माझे दैवत आहेत. वाल्मिक कराड माझे नेते आहेत. विष्णू चाटे आणि माझे संबंध होते, त्यामुळे आता तुम्ही सगळा समाज दुश्मन करणार का?”, असा संतप्त सवाल तांदळे यांनी उपस्थित केला आहे.
“सीआयडी ऑफिसमध्ये माझी चौकशी झाली. माझ्या समोर 300 पोलीस असताना मी त्यांच्यावर दाब कसा टाकू शकतो? इतकी दु:खद घटना घडली, त्या घटनेत मी दबाव टाकू शकतो का? दबाव टाकायला मी काय प्रशासनाचा जावई आहे का?,” असेही आंधळे म्हणाले आहेत.
“जर मी संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) आरोपी असेल तर माझ्यावर जरूर कारवाई करा. पण पुरावे नसताना आणि माझा दोष काहीच नसताना सहआरोपी करण्याची मागणी करू नका. जर माझा आणि आरोपींचा संपर्क असता तर मी आरोपी शोधून द्यायला मदत केली असती का?”, असा सवाल तांदळे यांनी उपस्थित केला.
Balaji Tandale on Santosh Deshmukh murder case
पुढे ते म्हणाले की, माझ्यावर आरोपींना चादर खरेदी करून दिल्याचा आरोप आहे. मी चादर घेतल्या हे मान्य करतो. पण चादर आरोपींना द्यायला नाही तर घरी घेतल्या आहेत. वाटलं तर घरी चला मी चादर दाखवतो,” असेही तांदळे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :