Dhananjay Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या झाली आणि अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून अडचणी वाढल्या आहेत.
याप्रकरणात आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य सरकारने धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये (Santosh Deshmukh murder case) दोषी आहेत की नाहीत याचा तातडीने खुलासा करायला पाहिजे. ही फक्त सरकारची नाहीतर संपूर्ण मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी,” असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.
“धनंजय मुंडे यांची संतोष देशमुख प्रकरणांमध्ये भूमिका काय होती? हे स्पष्ट केले नसल्याने मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे. जर धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण दोषी नसताना राजकीय दबावापोटी त्यांचा राजीनामा घेतला गेला तर दोषी असल्याचा समज होईल,” अशीही प्रतिक्रिया तायवाडे यांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यापासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनी धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळ तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंडेंवर गंभीर आरोप करूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही.
Babanrao Taiwade on Dhananjay Munde
यावरूनदेखील सरकारवर विरोधक निशाणा साधत आहे. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही? असा सवाल अजूनही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. लवकरच सरकारची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, असेही बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :