Share

Mumbai Indians च्या ‘या’ कमजोरींचा संघाला बसू शकतो मोठा फटका, कसं ते जाणून घ्या

by MHD
Weakness on Mumbai Indians in IPL 2025

Mumbai Indians । कालच मुंबई इंडियन्स या संघाने नवीन जर्सी आणि नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. यावर्षी देखील संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करताना दिसेल. पण संघाच्या अशा काही कमकुवत बाजू आहेत, ज्याचा संघाला फटका बसू शकतो.

मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात काही मोठ्या स्टार खेळाडूंना लक्ष्य केले आहे. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्स यावेळी काहीतरी मोठे करू शकते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. पण संघाच्या काही कमकुवत तर काही मजबूत बाजू आहेत.

Strong sides of Mumbai Indians

मुंबई इंडियन्स फलंदाजी

आयपीएलच्या सर्व संघांमध्ये पाहिले तर सर्वात धोकादायक फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. या संघात विल जॅक आणि रोहित (Rohit Sharma) शर्मा तसेच रायन रिकाल्टन यांच्यासारख्या जबरदस्त सलामीवीर आहेत आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या यांच्यासारख्या देखील फलंदाज आहेत.

मुंबई इंडियन्सचे गोलंदाज

मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये टी 20 लीगमध्ये विजेतेपद जिंकले. तेव्हापासून संघ विजेतेपदाची वाट पाहत आहे. टीममध्ये जस्प्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, रीस टॉपली सारख्या गोलंदाज आहेत, जे कोणत्याही संघाला घाम आणतात.

संघाकडे आहेत बरेच पर्याय

मुंबई इंडियन्स संघ सर्वात मजबूत आहे कारण त्यांची टीम पर्यायांनी परिपूर्ण आहे. या संघात विल जॅक आणि रोहित शर्मा व्यतिरिक्त रायन रिकाल्टन आहेत. तसेच ट्रेंट बोल्ट, जस्प्रीत बुमराह आणि त्यानंतर दीपक चहर, रीस टॉपली गोलंदाज आहेत. स्पिन बॉलिंगमध्ये मिचेल सेंटनर, मुजीब उर रहमान आणि त्यानंतर कर्ण शर्मा देखील आहेत.

Weakness of Mumbai Indians

अनुभव नसणारा विकेटकीपर

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात संघाकडून एक मोठी चूक केली की त्यांनी इशान किशनवर नजर ठेवली नाही. त्यानंतर संघाने रायन निकेल्टन आणि रॉबिन मिंगे यांना विकेटकीपर म्हणून निश्चितपणे लक्ष्य केले. पण दोघांमध्ये कोणतेही विशेष दिग्गज विकेटकीपर नाही.

स्पिन बॉलिंगमध्ये कोणताही मोठा भारतीय नाही

आयपीएलच्या या वेळी मुंबईच्या इंडियन्सच्या गोलंदाजीत कोणताही मोठा भारतीय फिरकी गोलंदाज सामील नाही. या संघात मिचेल सेंटनर, मुजीब उर रहमान यासारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत.

रोहित-सूर्याचा फॉर्म

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म चांगला नाही. ज्याचा संघाला येत्या काळात फटका बसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या :

Can Mumbai Indians do something big this time under Hardik Pandya captaincy? This is important to see. But the team has some weaknesses and some strengths.

Sports Cricket IPL 2025 Marathi News