Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असून पोलिसांना कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही सापडत नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगचे नागरिक येत्या 25 तारखेला अन्नत्याग उपोषण करणार आहेत.
अशातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बालाजी तांदळे (Balaji Tandale) याची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यात वापरण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
बालाजी तांदळेची गाडी आरोपीला ओळखणारा कोणीतरी असला पाहिजे म्हणून आम्ही घेऊन गेलो होतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पण आता संशयित आरोपीची गाडी वापरली असल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
धनंजय देशमुख सतत बालाजी तांदळेवर आरोप करत आहेत. अशातच आता पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली असल्याची माहिती समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी धनंजय देशमुख यांनी काही मागण्या केल्या आहेत.
Dhananjay Deshmukh on Balaji Tandale
“बालाजी तांदळे याला संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहआरोपी करा. त्याने आरोपींचा जामीन घेतला नसता तर हे झाले नसते,” असा दावा धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी बालाजी तांदळे याची गाडी वापरल्याने आता या प्रकरणातील तपासाला नवं वळण लागलं असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :