Suresh Dhas । भाजपचे आमदार सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज सुरेश धस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पण परळीत धस यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) समर्थकांनी काळे झेंडे दाखवत घेरले. यावेळी समर्थकांनी धस यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.
सुरेश धस परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. याच कारणामुळे त्यांनी आज धस यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला. यामुळे परळीत काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने दखल घेतली.
पोलिसांनी धस यांना विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमधल्या 16 लाख ठेवीदार आणि 5000 कोटी रुपयांचा प्रश्न आहे. त्यातील दीड लाखापेक्षा जास्त ठेवीदार हे एकट्या बीड जिल्ह्यातील असून 250 कोटी परळी शहरातील आहेत. कर्ज वाटपसुद्धा परळी तालुक्यातील आहे. कोटीचे कर्ज उचलणारेच झेंडे दाखवायला आले असतील,” असा आरोप धस यांनी यावेळी केला आहे.
Munde-Karad supporter showing black flag to Suresh Dhas
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते महेबुब इब्राहिम शेख यांनी सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करत निवडणूक याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठात धस यांच्या निवडीला आव्हान दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :