Maharashtra politics । सत्ताधारी आणि विरोधक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर आरोप करत असतात. परंतु आता याउलट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिंदे गटाचे दोन बडे नेते आपापसात भिडले आहेत.
शिंदे गटाचे हे दोन नेते म्हणजे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) होय. या दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
“मी मंत्री झालो म्हणून काही जणांच्या पोटात दुखत होते. आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही. आमचा शिवसैनिक अजूनही जित्ता आहे. कसली गुर्मी आणि मस्ती आहे. पालकमंत्री काय असतो दाखवतो. बांगड्या भरा साल्यानो, आमच्या नादाला लागू नका,”असा सल्ला संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मी पाच वर्षे पालकमंत्री राहणार असून राज्याचे काम जिल्ह्यातून करू. दादागिरीचे वारे मला संपवायचे आहे. या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे. कोणी गुंड समाजसेवक म्हणून वावरणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असाही इशारा शिरसाट यांनी दिला आहे.
Sanjay Shirsat vs Abdul Sattar
दरम्यान, संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर अतिशय जहरी टीका केली आहे. यावरून पुन्हा एकदा सत्तार विरुद्ध शिरसाट असा संघर्ष सुरु झाला आहे. शिरसाट यांच्या टीकेला सत्तार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते. असे जरी असले तरी यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची डोकेदुखी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :