Walmik Karad । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला केज कोर्टाने मोक्का लावला. त्यानंतर आज त्याला बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी आता कोर्टाने कराडला मोठा धक्का दिला आहे.
कोर्टाने कराडला 22 जानेवारीपर्यंत म्हणजे आणखी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे. कारण संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याने कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीने केली होती.
पण आता कोर्टाने 10 नाही तर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच कराडनेच हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला होता. यामुळे कराडच्या अडचणीत भर पडली आहे.
Police custody to Walmik Karad
इतकेच नाही तर ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून बोलणं झाल्याचे माहिती एसआयटीने बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :